कडूलिंब
 
भगवान कुबेरांच्या प्रिय वनस्पती कडूलिंब ही आहे. आपल्या घरात / व्यवसायाच्या ठिकाणी कडूलिंबच्या पानांचा टाळ असावा. त्याने वाईट शक्तीचा नाश होतो. व त्या जागेत पावित्र्य कायम राहते. दररोज धनदेवता कुबेरांच्या पोटाला कडूलिंबाची पाने लावून प्रार्थना करावी, असे केल्यास धनदेवता कुबेर प्रसन्न होतात.
कडूलिंबाचे फायदे :-
कडूलिंब अथवा कडूनिंब वा बाळंतलिंब (शास्त्रीय नाव :- Azadirachta indica ; कुळ : Meliacae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.


• संस्कृत - निम्ब/तिक्तक/अरिष्ट/पारिभद्र/पारिभद्रक/ पिचुमंद/ पिचुमर्द

• हिंदी-नीम/ नीमला

• बंगाली- निमगाछ

• कानडी-बेवु

• गुजराती-लींबडो

• मलयालम-वेप्पु/ अतितिक्त

• तमिळ-कड्डपगै/अरुलुंदी

• तेलगु-निम्बमु

• इंग्रजी – Indian lilak, Neam, Margosa Tree

• लटीन – Azadirachta indica

आपल्या देशात सगळीकडे एक वाक्य ऐकू येत. ते म्हणजे ज्या देशात कडूलिंबाचे वृक्ष असतात, तेथे मृत्यू आणि आजार फिरकत नाहीत. कडूलिंबाचे झाड संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरली असून आपल्या जीवनाशी त्यांचे एक वेगळे नाते जोडले गेले आहे. कडूलिंब फार गुणकारी असल्याने इतर देशांमध्येही त्याविषयी जागरुकता वाढली असून त्यांनाही कडूनिंबाचा लळा लागला आहे. कडूलिबाचे आयुर्वेदात मोठे महत्व सांगण्यात आले आहे. कडूलिंबाच्या औषधी गुणांना प्राचीन इतिहास आहे. चरक व सुश्रुत संहिता या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख आला आहे. त्याला ग्रामीण औषधालय या नावानेही ओळखले जाते. कडूलिंबाला कुठल्याच प्रकारची कीड लागत नाही. भारतात कडूलिंबाच्या झाडाकडे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून पहिले जाते. ग्रामीण भागात कडूलिंबाचा वापर साबण म्हणूनही करतात. त्याच्या कडूलिंबापासून मिळणारी पाने, निंबोळ्या,फांद्या व सालीचा उपयोग विविध आजारांवर करतात. कडूलिंबाचा 'एंटीसेप्टिक' म्हणूनही वापरले जाते.

कडूलिंबातल्या "मारगोसिन' या कडू रासायनिक द्रव्यामुळे त्याची चव कडू असते. याशिवाय त्यात ऐझारिडीन, रेझीन, टेनिन, बेन्झोईक एसिड, मेलिओटनिक एसिड, फिकस्ड ऑईल अशी अनेक रासायनिक द्रव्ये आहेत. "कडूपणा' हा कडुलिंबाचा विशेष गुणधर्म असला तरी या झाडाचे सर्व अवयव औषधी आहेत. पानांची पावडर उटण्यात वापरतात. त्यामुळे त्वचारोग बरे होतात. कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहीसे होतात. कडूलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम , इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडु, विपाकी, शीतवीर्य, लघु, मंदाग्नीकर- खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते.

पुरळ, त्वचेला लालसरपणा कमी होतो. पानांचा काढा करून जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. कारण पानं "जंतुनाशक' आहेत. शरीरावर गळवं झाल्यास पानाचं पोटीस बांधतात. पानापासून जे तेल काढतात ते कातडीच्या रोगावर उपयोगी पडतं. उष्णतेन डोकं दुखत असल्यास हे तेल डोक्यावर चोळल्यास डोखेदुखी कमी होते. कडुलिंबाच्या रसान गर्भाशयाचे रोग बरे होतात, रक्त शुध्द होते, कडुलिंबाच्या डहाळ्या दात घासण्यासाठी वापरतात. त्यामुळे तोंडाची दुर्गधी जाते. कडुलिंबाच्या सालीचा काढा वारंवार येणाऱ्या तापावर देतात. कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते कडूलिंबाची पाने मधाबरोबर चावून खाल्यास अपचनाची तक्रार दूर होते. घरात डास झाल्यास कडूलिंबाची वाळलेली पाने लाकडाबरोबर जाळून धूर करावा. रोज ८ ते १० कडूलिंबाची पाने चावून खाल्यास रक्त शुध्द होते. पानांचा रस घेतल्यासही रक्तशुध्दी होते. कडूलिंबाची पाने धान्यांच्या साठयात टाकली असता कीड लागत नाही. कडूलिंबापासून तयार केलेल्या तेलाने मालिश केल्यास गंभीर असे चर्मरोग नाहीसे होतात. लिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आरोग्यास लाभदायी ठरते. जुन्या कडूलिंबाच्या खोडातून जे पाणी निघतं ते त्वचारोगांवर उपयोगी आहे. जुनं खोड कापलं तर त्याला चंदनाच्या वासासारखा मंद सुवास येतो. फुलं विषारी असली तरी ती जंतुघ्न असल्यामुळे जखमांवर त्याचा लेप लावल्यास त्या लवकर बऱ्या होतात. विदेशात कडूलिंबावर संशोधन करण्यात येत असून डायबेटीजपासून तर एड्स, कन्सर यासारख्या गंभीर आजारावर जालीम औषधाचा शोध घेतला जात आहे याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे.

कडुलिंब खाणे रूढी गुढी पाडव्याची !

आधी कडु, प्राप्ती मग अमृताची !!

कडु असल्यामुळे 'जंतुघ्न' हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वासाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात. कडुलिंबात कडूपणा असला तरी आपल्या आरोग्यासाठी ते वरदानच आहे. हा जणू कल्पवृक्षच आहे.
 
         
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI