?यंत्र
 
या यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्याभोवती कवच म्हणून काम करते. या यंत्रांचे मंत्रोच्चारासह व्यवस्थित धारण केल्यास त्याचा लाभ तर होतोच, शिवाय त्याची शक्तीही अबाधित राहते. हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर यांचे आहे. ह्या यंत्राच्या प्रभावाने यक्षराज कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात. हे यंत्र सोने, चांदी किवा ताम्र धातू चे असते. हे यंत्र घरात किवा धंद्याचा ठिकाणी असणे जरुरी आहे. या यंत्राच्या स्थापनेने दारिद्रतेचा नाश होतो व धन-यश यांची प्राप्ती होते.
 
 

या यंत्राची स्थापना कोणत्याही बुधवारी किवा शुक्रवारी करावी. तसेच धनत्रयोदशी, पौर्णिमा, एकादशी या शुभमुहूर्तावर देखील कुबेर यंत्राची स्थापना हा शुभ योग आहे. प्रथम उत्तराभिमुख (उत्तर दिशेस तोंड करून) बसावे नंतर स्वतःच्या कुलदेवतेचे व श्री गणेशांचे स्मरण करावे व भगवान कुबेर यांना नमस्कार करून आपली मनोकामना सांगावी व खालील कुबेर मंत्राची माळ १०८ वेळा करावी

ll ॐ हिम् श्रिम् क्लिम् वित्तेश्र्वराय नम : ll

मंत्र पूर्ण झाल्यावर भगवान कुबेरांची आरती व मंत्रापुष्पाजली म्हणावी.

 
         
 
FESTIVAL INVITATION   GOD KUBER INFORMATION BOOK
 
KUBER PALAKHI YATRA ON 27 SEPTEMBER 2014   HINDI / MARATHI